logo

नाशिक जयंती 2024 च्या स्वागत अध्यक्षपदी प्रा. डॉ. आहिरे......


नाशिक : नाशिक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती स्वागताध्यक्षपदी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. आनंद आहिरे यांची निवड करण्यात आली. जयंती समितीची बैठक मुख्य संयोजक सुनील कांबळे यांच्या उपस्थितीत झाली. यात एकमताने डॉ. अहिरे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकर जयंती सप्ताह साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यावेळी अतुल भावसार, ड. विजय पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, माजी शिक्षणाधिकारी डॉ. रामचंद्र जाधव, पंडितराव जगताप- पाटील, सुवर्णा दोंदे, प्रा. विजयकुमार पाईकराव, गोरख आहिरे आदींनी डॉ. आहिरे यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.

86
1295 views